Radha Krishna Vikhe Patil criticize Uddhav Thackeray | Sarkarnama

उद्धव ठाकरेंचा 'गझनी' झालाय: विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

...तरी वाईट वाटणार नाही 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांचा पक्षही रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद पवारांना मिळू शकेल, अशी चिन्ह दिसत आहेत? यावर विखे-पाटील म्हणाले, ""हे पद शेवटी संख्याबळावर अवलंबून असते; पण पद गेले म्हणून मला वाईट वाटणार नाही. राजकारणात कोणतेही पद कायमस्वरूपी नसते. मिळालेली जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडत आहोत.'' 

पुणे : "आगामी काही निवडणुका संपल्यानंतर कॉंग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार आहे. कारण, सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. तरीसुद्धा त्यांना जागे करण्याची वेळ आली आहे'', असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. शिवसेनाच आंदोलन करत असली तरी त्यांना स्वत:च्या अनेक घोषणांचा विसर पडला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तर "गझनी' चित्रपटातल्यासारखे जुनी छायाचित्र दाखविल्याशिवाय काही आठवत नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांची खिल्लीही उडवली. 

एका कार्यक्रमानिमित्ताने विखे-पाटील पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "देशात सर्वांत महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे. कर्जमाफी संदर्भातही सरकार गंभीर नाही. ही प्रक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून एकही मंत्री प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांमुळे आणि राज्य सरकारच्या फसव्या घोषणांमुळे, वेगवेगळ्या करांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याविरोधात आम्ही आवाज उठवतच आहोत; पण हा आवाज अधिक व्यापक झालेला येत्या काही दिवसांत दिसेल.'' 

...तरी वाईट वाटणार नाही 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांचा पक्षही रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद पवारांना मिळू शकेल, अशी चिन्ह दिसत आहेत? यावर विखे-पाटील म्हणाले, ""हे पद शेवटी संख्याबळावर अवलंबून असते; पण पद गेले म्हणून मला वाईट वाटणार नाही. राजकारणात कोणतेही पद कायमस्वरूपी नसते. मिळालेली जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडत आहोत.'' 

विखे-पाटील म्हणाले 
- नारायण राणे यांचा निर्णय चुकीचा की बरोबर? याचे मूल्यमापन त्यांनीच करावे. 
- कॉंग्रेसमधून कोणीही बाहेर गेला तरी पक्ष कमकुवत होणार नाही. 
- शिवसेना हाच एक मोठा विनोद बनला आहे. त्यांनी आपले अस्तित्व गमावले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख