राणेंचा डोळा "महसूल'वर; पण चंद्रकांतदादांची ऑफर "पीडब्लूडी'ची 

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे निश्चित आहे. मात्र त्यांना खाते कोणते द्यायचे, यावर संघर्ष होऊ शकतो. त्यातही महसूलपदासाठी स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत.
राणेंचा डोळा "महसूल'वर; पण चंद्रकांतदादांची ऑफर "पीडब्लूडी'ची 

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. त्यांना राज्यात मंत्रिपद मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते हे राणे यांना देण्याचीही तयारी दाखवली आहे. प्रत्यक्षात मेख येथेच आहे. राणे यांना चंद्रकांतदादांकडील महसूल खाते हवे आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातूनही राणेंनी महसूल खाते मागावे, असा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या खातेबदलात भाजपमधील अंतर्गत स्पर्धाही असल्याचे बोलण्यात येते. 

राज्यात क्रमांक दोनचे महसूलखाते मानले जाते. चंद्रकांतदादांना ते सोडायचे नाही. बांधकाम खाते देईल पण महसूल सोडणार नाही, असेच चंद्रकांतदादांना अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलताना पाटील यांनी "पीडब्लूडी'ची ऑफर स्वतःहून व्यक्त केली. 

एकथान खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर पाटील यांच्याकडे महसूल खाते आले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनुसारच त्यांना ही जबाबदारी मिळाली होती. बांधकाम आणि महसूल अशी दोनही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. माजी मुख्यमंत्री पक्षात आल्यानंतर त्यांनाही साजेसे खाते द्यावे लागणार आहे. महसूल खाते असलेला क्रमांक दोनच मंत्री मानला जातो. त्यामुळे राणे हे महसूल मिळण्यासाठी प्रयत्न करतील, यात शंकाच नाही. दुसरीकडे अमित शहांशी चंद्रकांतदादांचे असलेले संबंध पाहता ते हे खाते सहजासहजी सोडणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. 

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना राणे यांच्याकडे महसूल खाते होते. ते शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना महसूल खाते देण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांना उद्योग खात्यावर समाधान मानावे लागले. 1985 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री राहिललेले शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून परतले तेव्हा झाले तेव्हाही त्यांना महसूल खाते देण्यात आले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com