race between tupe and prashant jagtap for hadpsar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी हडपसरमधून तुपेंसह प्रशांत जगतापांचीही मोर्चेबांधणी

उमेश घोंगडे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची त्यांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघात तुपे हे सुरवातीपासून इच्छुक आहेत. मात्र तुपे यांना शहराध्यक्ष करण्यात आल्याने या मतदारसंघातील दुसरे इच्छुक माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आमदारकीची तयारी सुरू केली आहे. पक्षातून हे दोघे तुल्यबळ इच्छुक असले तरी दोन्ही कॉंग्रेसमधील युतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला तरच या दोघांची स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. 

राष्ट्रवादी काॅग्रेसच्या गुरूवारी जाहीर झालेल्या पक्ष प्रवक्‍त्यांच्या यादीत पुण्यासाठी आधीच्या प्रवक्‍त्यांबरोबरच चेतन तुपे यांच्याकडे नव्याने ही जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात तुपे यांना पक्षाचे शहराध्यक्ष करण्यात आले. मात्र हडपसर मतदारसंघावरील दावा त्यांनी कायम ठेवला होता. त्यासाठी त्यांना पक्षातूनच संघर्षाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

पक्षातील आणखी इच्छुक माजी महापौर प्रशांत जगताप यांनी हडपसरमधून आमदार होण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. पक्षाने संधी दिली तर आपण हडपसरमधून विधानसभा मतदारसंघातून नक्की लढणार असल्याचे जगताप यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. निवडणूक लढण्यासाठी आवश्‍यक तयारी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात शहराध्यक्ष तुपे यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. हडपसरमधून माझा पूर्वीपासूनच दावा आहे. यापूर्वी मी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे पक्ष योग्य निर्णय घेईल. पक्ष सांगेल तो निर्णय अंतीम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी  युती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही युती खरोखरच झाली तर हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर हा मतदासरसंघ राष्ट्रवादीकडे राहिला तरच या दोघांपैकी एकाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्‍यता आहे. 
 
संबंधित लेख