ra ra borade talks with vikhe patil about navnath gore | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

रा. रं. बोराडे विखेंशी बोलले, आता नवनाथची 'फेसाटी' कमी होईल! 

संपत मोरे 
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

मला राजकारण्यातील संवेदनशिलतेचे दर्शन घडले. आजकाल हे चित्र कमी दिसते.पण प्रवरानगर हा एक विचार आहे. तिथे बुद्धीची कदर केली जाते.विचाराचा आदर केला जातो. राधाकृष्ण विखेपाटील राजकारण आणि सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालवत आहेत. - रा. रं. बोराडे 

पुणे : "नवनाथ गोरेसारखा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेला पोरगा बेकारीत आयुष्य जगतोय. त्याला नोकरी नाही, रहायला घर नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.ही खंत मी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलून दाखवल्यावर त्यानी नवनाथला नोकरी देण्याचे कबूल केले आहे', असे प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

बोराडे यांना नुकताच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रवरानगरला गेल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलताना बोराडे यांनी "नवनाथ गोरेला नोकरी द्या, त्याला नोकरी मिळाल्यावर तो अजून चांगले लेखन करेल' अशी विनंती केली. नंतर कार्यक्रमातही बोराडे यांनी तसा उल्लेख केला.यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोराडे सरांना नवनाथला आमच्या संस्थेत नोकरी देण्याचे वचन दिले. 

रा रं बोराडे हे लिहिणाऱ्या पोरांच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात. त्यांना मार्गदर्शन करतात. पण ही लिहिती पोरं आयुष्यात स्थिर व्हावी म्हणूनही त्यांचा प्रयत्न राहिला आहे. स्वतःचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारायला गेलेला बोराडे सरांसारखा प्रसिद्ध लेखक नवनाथ गोरे यांच्यासारख्या एका लिहिणाऱ्या पोराच्या नोकरीसाठी विनंती करतो हे चित्र साहित्यविश्वात दुर्मिळ आहे. ही विनंती प्रत्यक्षात आलीतर फेसाटीच्या नाथाच्या आयुष्याची फेसाटी कमी होईल. 

संबंधित लेख