PWP Jayant Patil Criticises Anant Gite | Sarkarnama

बॅंकेची चैाकशी करणाऱ्या गितेंनी स्वतःकडे बघावे  - जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मे 2019

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मोठ्या कष्टाने उभी केली आहे. या बॅंकेच्या यशामागे अधिकारी, कर्मचारी, संचालकांचा सिंहाचा वाटा आहे. बॅंक आज वेगळ्या उंचीवर ठेवण्यात यश आले आहे. अनंत गीते यांनी खासदार म्हणून जिल्हा बॅंकेला कधी भेट दिली आहे का, जिल्हास्तरिय सल्लागार समितीच्या बैठकीला कधी हजर झाले का, असा सवाल उपस्थित करीत बॅंकेची चैाकशी करणार असे बोलणाऱ्या गितेंनी पहिले स्वतःकडे डोकावून बघावे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

 

अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मोठ्या कष्टाने उभी केली आहे. या बॅंकेच्या यशामागे अधिकारी, कर्मचारी, संचालकांचा सिंहाचा वाटा आहे. बॅंक आज वेगळ्या उंचीवर ठेवण्यात यश आले आहे. अनंत गीते यांनी खासदार म्हणून जिल्हा बॅंकेला कधी भेट दिली आहे का, जिल्हास्तरिय सल्लागार समितीच्या बैठकीला कधी हजर झाले का, असा सवाल उपस्थित करीत बॅंकेची चैाकशी करणार असे बोलणाऱ्या गितेंनी पहिले स्वतःकडे डोकावून बघावे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक यांचा अभिष्टचिंतन सोहळाबॅंकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमळाकर वाघमोडे, मंदार वर्तक, नंदकुमार मयेकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले, बांधिलकी ठेवून मोठ्या आत्मीयतेने प्रदिप नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भुमिका प्रामाणिकपणे बजावली आहे. प्रदिप नाईक यांचे बॅंकेच्या यशामध्ये एक वेगळे योगदान आहे. बॅंकेमध्ये अनेक प्रदीप नाईक घडले पाहिजे. या पध्दतीने काम करण्याची गरज आहे. बॅंकने आज वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु, बॅंकेची चैाकशी करणार असे बोलणाऱ्या अनंत गीतेंनी स्वतःकडे बघावे, आमदार प्रवीण दरेकर यांनाही आपण जाब विचारणार असेही ते म्हणाले. 

संबंधित लेख