PWD's 7 acre land scandle | Sarkarnama

तुर्भे येथे  सार्वजनिक बांधकाम खात्याची ५ एकर  जमीन हडपली : चंद्रकांत पाटील

प्रशात बारसिंग  :  सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई  : सायन पनवेल महामार्गालगतची तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन खाजगी व्यक्तीने परस्पर विकल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात शिवसेनेचे रविंद्र फाटक यांनी तारांकित प्रश्न विचारला असता पाटील बोलत होते.

सायन पनवेल महामार्गासाठ शासनाने 1965 साली संपादित केलेल्या तुर्भे येथील 2 हेक्‍टर 88 आर या जमिनीतील शिल्लक 1 हेक्‍टर 70 आर इतकी जमीन शासनाने मूळ मालकाला परत केल्याचे बनावट कागद पत्रां द्वारें दाखवून पुण्यातील एका गुंतवणूक दारासोबत15 कोटींचा व्यवहार करून विजय बाबू पाटील आणि अन्य 38 जणांनी शासनाची फसवणूक करण्यात आली.

 याबाबत नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र सदरच्या जमिनीचा 7/12 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर असल्याची माहिती त्यांनी दिली. सदरचा गैरव्यवहार होताना नोंदणी विभागातील अधिकारी सामील होते किंवा नाही याबाबत योग्य चौकशी करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख