सुप्रिया सुळेंच्या फेसबुक लाइव्हनंतर खड्डे बुजू लागले

सुप्रिया सुळेंच्या फेसबुक लाइव्हनंतर खड्डे बुजू लागले

बारामती शहर : खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव-जेजुरी रस्त्याच्या खड्ड्यांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने शुक्रवारी (ता. 16) खड्डे भरण्यास सुरवात झाली. 

राज्यातील दोन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा व तितकाच वर्दळीचा रस्ता असतानाही या रस्त्यावरील खड्ड्यांची दखल प्रशासन घ्यायलाच तयार नव्हते. रस्त्याचे काम सुरू होणार असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार सांगितले गेले. प्रत्यक्षात दिवाळी उलटूनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही.

गुरुवारी मोरगावहून जेजुरीकडे एका कार्यक्रमासाठी जाताना या खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्ह करून थेट मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे, असे आवाहन केले आणि मग यंत्रणा हलली. शुक्रवारपासून बारामती बाजूकडून रस्त्यांवरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. 

बारामती हद्दीपर्यंत गुळगुळीत रस्ता आणि बारामती हद्द ते थेट जेजुरीपर्यंत अत्यंत दयनीय रस्ता अशी स्थिती आहे. जेजुरी शहरात आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतही खड्डे इतके मोठे झाले आहेत की दुचाकीस्वार अनेकदा या खड्ड्यांतून पडतात. जेजुरीनजीक दोघे जण अपघातात जखमी झाले. दोन्ही बाजूंनी पहिल्या टप्प्यात खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल, अशी माहिती बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com