pvt bill for bullock cart race | Sarkarnama

बैलगाडा शर्यतीसाठी आता आढळरावांचे खासगी विधेयक

उत्तम कुटे
शुक्रवार, 9 मार्च 2018

पिंपरी : न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेली राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे लोकसभेत खासगी विधेयक मांडणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सध्या सुरु आहे. ते सुरळीत राहिल्यास हे विधेय़क मांडणार असल्याचे आढळराव यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

पिंपरी : न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेली राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे लोकसभेत खासगी विधेयक मांडणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सध्या सुरु आहे. ते सुरळीत राहिल्यास हे विधेय़क मांडणार असल्याचे आढळराव यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

बाकीचे राजकारणी फक्त घोषणा करतात. परंतु बैलगाडा शर्यतींसाठी गेली 13 वर्षे तळमळीने संघर्ष करणारा महाराष्ट्रातील मी एकमेव खासदार असल्याचे ते म्हणाले. खासदारांचा हा टिकेचा रोख भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता.हा माझा राजकीय स्टंट नसून प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तेलगू देसम व एआयडीएमके खासदारांच्या गोंधळामुळे गेले 4 दिवस लोकसभेचे कामकाज झालेले नाही. सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु राहिल्यास बैलगाडा शर्यती सुरु होण्यासंबंधीचे खाजगी विधेयक लोकसभेत सादर करण्याची संधी मिळू शकेल,असे दादा म्हणाले. मात्र, जर आज सभागृहाचे कामकाज न झाल्यास हे विधेयक 23 मार्च रोजी मांडेल, असे ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालयाने 7 मे 2014 रोजी  बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली. ती उठविण्यासाठी नंतर राज्याने कायदा केला. राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली. मात्र, त्यालाही पेटा या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायम राहिली. आता त्यावर केंद्राचा कायदा हाच एक रामबाण उपाय राहिलेला होता. मात्र, केंद्र तो आणण्यास तयार नव्हते. संसदेच्या मागील अधिवेशनादरम्यान नियम 377 अंतर्गत केलेल्या मागणीला उत्तर देताना केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतींचे विधेयक मांडण्यास नकार दिला होता. त्यामुळे आढळराव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.त्यांनी ज्या कायद्यान्वये (प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा,1960) बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली,त्या कायद्यात दुरुस्ती सुचविणारे हे खासगी बिल आणले आहे.

संबंधित लेख