purushottam khedekar about shrimant kokate | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

कोकाटेंच्या केसाला धक्कातरी लावून बघा? : पुरूषोत्तम खेडेकर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर पुढच्याची गय नाही. जशास तसे उत्तर देऊ. त्यांच्या पाठीशी संघटना व सकल मराठा समाज उभा आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे. 

औंध (सातारा) : इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर पुढच्याची गय नाही. जशास तसे उत्तर देऊ. त्यांच्या पाठीशी संघटना व सकल मराठा समाज उभा आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे. 

औंध (ता. खटाव) येथे मराठा सेवा संघाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, भिमराव भोसले, सोलापूर विभागीय अध्यक्ष उत्तम माने, मराठा क्रांती मोर्चाचे खटाव तालुका समन्वयक विनोद शिंदे, हणमंतराव शिंदे, डॉ. विवेक देशमुख, राजाभाऊ देशमुख, आदी उपस्थित होते. 

कोणत्याही व्यक्तीला मारता येते परंतू तिचे विचार मारता येत नाहीत, असे सांगून खेडेकर म्हणाले, राज्यात एका ठराविक विचाराने प्रेरित झालेल्या संघटनांकडून विचारवंतांच्या हत्या करण्याचे सत्र सुरु आहे. अजूनही काही नावे संशयित आरोपींच्या कागदपत्रांमध्ये समोर आली आहेत. त्यामध्ये श्रीमंत कोकाटेंचे ही नाव असल्याचे समोर येत आहे. शासनाने आता अशा संघटनांवर बंदी घालण्याची योग्य वेळ आली आहे. श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जरी धक्का लागला तर कोणाची खैर केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

संबंधित लेख