puntanba farmer strike | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पुणतांब्यात कडकडीत "बंद', रुळावर आंदोलन; डॉ. नवले यांची अनवाणी पदयात्रा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जून 2017

आंदोलक शेतकऱ्यांनी दुपारी अचानक रेल्वे रुळावर धाव घेतली. स्थानकासमोर उभ्या असलेल्या मालगाडीपुढे त्यांनी आंदोलन सुरू केले. रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
किसान क्रांतीच्या "कोअर कमिटी'चे सदस्य असलेले डॉ. नवले सकाळी आले. कमिटीने संप मागे घेतल्याचे प्रायश्‍चित्त म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसह गावातून अनवाणी पदयात्रा काढून आत्मक्‍लेष केला.

पुणतांबे : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी आजच्या "महाराष्ट्र बंद'मध्ये शेतकऱ्यांनी "रेल रोको' आंदोलन केले. संप मागे घेतला गेल्याबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी गावातील मुख्य रस्त्यावरून अनवाणी पदयात्रा काढली. कडकडीत "बंद'मुळे आठवडेबाजारही भरला नाही. 

"बंद'मुळे स्टेशन रस्त्यावर, बाजारपेठेत शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवून संपास पाठिंबा दिला. संकलन केंद्र बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दूध फेकून दिले. आंदोलक शेतकऱ्यांनी दुपारी अचानक रेल्वे रुळावर धाव घेतली. स्थानकासमोर उभ्या असलेल्या मालगाडीपुढे त्यांनी आंदोलन सुरू केले. रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
किसान क्रांतीच्या "कोअर कमिटी'चे सदस्य असलेले डॉ. नवले सकाळी आले.

कमिटीने संप मागे घेतल्याचे प्रायश्‍चित्त म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसह गावातून अनवाणी पदयात्रा काढून आत्मक्‍लेष केला. नाशिक येथील बैठकीत नव्याने समिती स्थापन करण्यात आली आहे. खासदार राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, बुधाजीराव मुळीक, अनिल धनवट, गिरीधर पाटील, संजय पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली संप सुरू राहील. आपण त्याला साथ द्यावी, असे आवाहन नवले यांनी केले.

या वेळी डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब भोरकडे, अनिल नळे, अभय चव्हाण आदी उपस्थित होते. 

बैठकीत बोलू दिले नाही : नवले 
डॉ. नवले म्हणाले, ""पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संकल्पना मांडून शेतकरी संपाचा राज्यातील पहिला ठराव केला. तुम्हाला सलाम करण्यासाठी मी येथे आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करताना कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे काय, असा सवाल उपस्थित केला होता.

कमिटीतील दोन माणसांनी (तुमच्या गावातील सोडून) मला बोलू दिले नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तुमच्या ग्रामपंचायतीने मांडलेल्या ठरावाचा विजय व्हावा, यासाठी संपात सर्वांनी सहभागी व्हावे.'' 

संबंधित लेख