माैन वृताने  शेतकरी संपाची सांगता ;  पुणतांब्यात  दुध संकलन सुरू 

आमचा हेतू निःस्वार्थीआम्ही प्रारंभीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली.आश्वासनापलिकडे ते काहीच देण्यास तयार नव्हते.शेतकऱी बांधवाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रारंभी मी संप मागे घेण्याचे जाहीर केले.मात्र इतरांनी मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून आंदोलन चालू ठेवले.आता मीही माझे कर्तव्य करणार आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत राहणार.माझा हेतू निःस्वार्थी आहे.राजकारणविरहीत आहे,असे डाॅ.धनवटे यांनी स्पष्ट केले.
Puntamba farmers
Puntamba farmers

नगर :  गेले सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाची सांगता आज माैन वृत करून झालीशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार आता बहिरे झाले आहेकितीही ओरडलेमोर्चे,आंदोलने केलीसर्व प्रकारचे मार्ग अवलंबिलेपण न्याय मिळत नाहीसरकारच बहिरे झाल्याने आता आम्ही मुके होऊन निषेध करीत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहेत्यामुळे पुणतांब्यात आजपासून दुध संकलन सुरू झाले.

शेतकरी संपाची पहिली सभा तीन एप्रिल रोजी झालीपंचवीस ते तीस मे दरम्यान धरणे आंदोलने झालीविविध राजकीय मंडळींनीही संपाला पाठिंबा दिलाकिसान क्रांतीमार्फत केलेल्या आवाहनानुसार एक जून पासून शेतकरी संपावर गेलाआंदोलनात राज्यभरातून शेतकरी सभा झाल्यासंप काळात शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झालेशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीतअसे आंदोलनाचे एक नेते डाॅधनंजय धनवटे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कोणतेही राजकारण न आणता लढलोपण राजकीय मंडळींनी आमच्यात फुट पाडलीसंपूर्ण राज्यात संप यशस्वी होऊनही पदरात काही पडता दिसत नाही.सरकार फक्त आश्वासनांची खैरात करतेशेतकऱ्यांच्या नेत्यांमध्येच एकी राहिली नाही.राजकीय हस्तक्षेप वाढलासत्ताधाऱी सरकारने हे आंदोलन गुंडाळलेशेतकऱ्यांनी कितीही आगपाखड केलीतरी सरकार एेकण्याच्ाय मनःस्थितीत नाहीबहिरे झालेल्या सरकारला आता मुके होऊन उत्तर देऊअसे डाॅधनवटे म्हणालेआता यापुढे नाशिक येथील सुकाणू समिती काय निर्णय घेईलत्यानुसारच आंदोलने केले जातील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com