पुण्यातील माजी आमदार वसंतराव थोरात यांचे निधन

पुण्यातील माजी आमदार वसंतराव थोरात यांचे निधन

माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. थोरात यांच्या मागे त्यांची पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे : माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. थोरात यांच्या मागे त्यांची पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

वसंत थोरात यांचा अखिल मंडई मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कामात महत्वाचा वाटा होता. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते. 1974 -75 मध्ये ते महापौर झाले. मंडईमध्ये त्यांनी राज्यातले पहिले मध्ये झुणका भाकर केंद्र 1974 सुरु केले. महाराष्ट्रात प्रथम महापौर चषक कबड्डी स्पर्धा त्यांनी भरवली होती. लोकसभा निवडणुकीत 1977 ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. 1991 मध्ये ते आमदार झाले. शिवाजी मराठा सोसायटीचे ते मानद सचिव, अ. भा. मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार, सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त आणि बदामी हौद संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com