पुण्यात भाजपाचा पराभव निश्‍चित;म्हणूनच खासदार बापटांकडे नेतृत्व

भाजपात प्रवेश केलेले अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी इच्छुक आहेत,
prashant
prashant

पुणे : पुणे महानगरपाकिलेची निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या निवडणुकीत भाजपाचे पानिपत होणार असल्याचे माहीत असल्यानेच खासदार बापट यांना बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयामुळे निवडणुकीची नेतृत्व खासदार बापट यांच्याकडे आले असल्याने ही निवडणूक खासदार बापट यांच्या राजकीय अस्ताची ठरणार असल्याची भविष्यवाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.(BJP's defeat in Pune is certain; that is why MP Bapat has the leadership)

‘सरकारनामाशी’ विशेष मुलाखतीत बोलताना जगताप यांनी सव्वाचार वर्षे सत्तेत असलेल्या भाजपा पुण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका केली. ते म्हणाले, ‘‘ पुण्यात आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहोत. या निवडणुकीत भाजपाचे पानिपत ठरलेले आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील पुण्याची जबाबदारी आपल्याकडे घ्यायला तयार नाहीत. अपयश येणार हे माहीत असल्याचे खासदार बापट यांना बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. मुळात यश मिळविण्यासारखे काहीही कर्तृत्व भाजापाने गेल्या सव्वाचार वर्षात दाखविलेले नाही. या काळात एकही नवी योजना भाजपाने आणली नाही. मेट्रोपासून चोवीस तास पाणी पुरवठा योजनेपर्यंतच्या अनेक मोठ्या गप्पा भाजपाकडून मारल्या जात आहेत. मात्र, या सर्व मूळ योजना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिकेतील सत्ता काळातल्या आहेत.’’

महापालिका निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपात प्रवेश केलेले अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी इच्छुक आहेत, असे जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ अनेकजण संपर्कात आहेत. मात्र, आता लगेच त्यावर बोलणे योग्य होणार नाही. महापालिका निवडणुकीत एक किंवा दोनच्या प्रभागाला बहुतेकांची पसंती आहे. मात्र, आमच्यासाठी कोणत्याही पद्धतीने निवडणूक घेतली तर आमची त्याला तयारी आहे. काहीही झाले तरी आम्ही सत्तेत येणार आहोत.’’

महाापलिका निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून येत्या काही दिवसात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. तरूण आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून संघटना एकजीव करण्याचा माझा प्रयत्न राहील. संघटनात्मक बांधणी चांगल्याप्रकारे करून निवडणूक सक्षमपणे सामोरे जाऊ. पुणे महापालिकेत याआधी अकरा गावे तसेच आता नव्याने २३ गावांचा समावेश झाला आहे. या एकूण ३४ गावांच्या समावेशाचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहरात सक्षम आहे. पक्षाची मोठी ताकद पुण्यात आहे. महापालिकेच्या सत्तेतून भाजपाला घालविणे हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येऊन भाजपाला सत्तेतून दूर करू, असा विश्‍वास जगताप यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com