Pune workers ring the BSE share market bell | Sarkarnama

पुण्यातील राजकीय कार्यकर्त्यांना शेअर बाजारच्या घंट्याचे कुतूहल  !

सरकारनामा न्युज ब्युरो
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई  : शेअर बाजार आणि त्यासाठी असलेल्या बीएईच्या मुख्य इमारतींचे सर्वांनाच आकर्षण असते. मात्र या इमारतीत जाण्याची संधी मिळाली की, त्याचा कसा लाभ घ्यायचा याचा एक नवा आदर्श पुणेकरांनी आज घालून दिला.

पुणेकरांसाठी काही उणे नसते असेच ते अनेक प्रसंग होते. पहिल्यांदाच शेअर बाजाराच्या इमारतीत आणि त्यातही मुख्य सभागृहात आलेल्या पुण्यातील राजकीय कार्यकर्त्यांना इमारतीसह सभागृहातील व्यासपिठावर ठेवण्यात आलेल्या घंट्याचेही मोठे कुतूहल निर्माण झाले होते.

हा घंटा शेअर बाजारात अनेक प्रकारच्या शेअरच्या उच्चांकासाठी अभिनंदन करताना वाजवला जातो, मात्र पुण्यातून आलेल्या या राजकीय कार्यकर्त्यांनी ज्याच्या हातात घंटा वाजविण्यासाठी हातोडा मिळेल त्यांनी तो वाजवून आपली हौस भागवून घेतली.

एकाच वेळी अनेकांनी घंटा वाजताना कधी ग्रूपसह फोटो काढून घेतले तर कधी एक-एकाने फोटो काढून घेत हा घंटा आणि त्यासोबतच फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ठेवला.

यात पुणे महापालिका आणि राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्याही मागे राहिल्या नाहीत. त्यांनी तर आपल्या मोबाईलसह पुण्याहून आलेल्या काही कॅमेरामनला पकडून आपले ग्रूप फोटो या घंट्यासोबत काढून घेऊन आपली हौस पूर्ण केली. 

दुसरीकडे सभागृहात कार्यक्रमाच्या दरम्यान मान्यवरांना बोलण्यासाठी बीएसईकडून त्यांच्या नावासह लावण्यात आलेल्या माईकवर आपण बोलत असल्याचेही फोटो काढण्यास मोठी गर्दी केली होती.

पुण्यातून खास आलेल्या राजकीय पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर बंद असलेल्या माईकवर बोलण्याचा आव आणत आपले फोटो काढत काढले.

अनेकांनी तर आपण बोलत असल्याचे दाखवून त्याचे व्हिडीओ शूट केले. वर हातवारे करत, तर आपण काही तरी बोलत असल्याचे अनेकांनी दाखवून देत हे फोटो काढले.

 एकुणच कार्यक्रमानंतर पुणेकरांनी शेअर बाजारातील कोणतीही वस्तू आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यावाचून सोडली नाही. मुख्य प्रवेशद्वारावर तर आयुक्‍तांनाच बुलच्या बाजूला उभे करून त्यांच्यासह फोटो काढून घेतल्याने पुणेकरांनी काहीच उणे नसते याची त्यांनी प्रचिती दिली.
 
संबंधित लेख