pune will become number city : CM | Sarkarnama

पुण्याला नंबर एकचे शहर बनविणार : मुख्यमंत्री

उमेश घोंगडे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे : देशातील शाश्वत विकासाचे क्रमांक एकचे शहर बनण्याची पुण्याची क्षमता आहे. गेल्या चार वर्षात त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. पुण्याच्या सर्वांगीण विकास करून पुण्याला देशातील क्रमांक एकचे शहर बनवू असा, निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात केला. खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते. 

म्हाळुंगे-माण हायटेक सिटीच्या कामाचे भूमीपूजन आज झाले. या माध्यमातून पुण्यात येत्या दोन वर्षात दोन लाख रोजगार निर्माण होतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याचा लौकिक आहे. स्टार्टअपमध्येदेखील पुण्याचाच पहिला क्रमांक असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीत स्पष्ट झाल्याने देशाचे स्टार्टअप कॅपिटलदेखील पुणे असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याच्या विकासकामांवर गेल्या चार वर्षात विशेष लक्ष दिल्याचे सांगून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "" गेल्या वीस वर्षात ज्यांनी पुण्यासाठी काहीच केले नाही ते आता आमच्यावर टीका करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नव्या कार्य संस्कृतीची सुरवात केली आहे. आयुष्यमान भारत, उज्वला गॅस योजना, प्रत्येक घरात वीज, मुद्रा कर्ज योजना, गृह योजनेसाठी अनुदान या प्रकारच्या नव्या योजना सुरू करून एक इतिहास निर्माण केला आहे. पुण्यात दोन लाख घरांची गरज असून ही गरज आपण नक्की पूर्ण करू. समारे10-11 कोटी लोकांना रोजगार देणारी मुद्रा योजना जगातील अशा प्रकारची एकमेव योजना आहे.'' 

कार्य अहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फठणवीस यांनी खासदार शिरोळे यांच्या कामाचे कौतुक केले. लोकसभेच्या कामकाजात पूर्णवेळ सहभागी होणारे खासदार पुणेकरांना लाभले आहे. खासदार म्हणून शिरोळे यांना पंतप्रधान मोदी यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते याचा मलादेखील हेवा वाटतो, या शब्दांत त्यांनी खासदार शिरोळे यांचे कौतुक केले. 
 
संबंधित लेख