निमित्त 'दिवाळी पहाट'चे : व्यासपीठावर मात्र रंगली राजकीय फटकेबाजी

दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात मराठी- हिंदी गाण्याबरेाबरच राजकीय फटकेबाजी वाघेालीकराना ऐकण्यास मिळाली. सुप्रसिध्द गायक अवधुत गुप्ते व वैशाली सामंत यांनी रंगारंग गाणी सादर केली. तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी जिल्हा परीषद सदस्य मंगलदास बांदल, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रदीप कंद व जिल्हा परीषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यानी राजकीय फटकेबाजी केली.
निमित्त 'दिवाळी पहाट'चे : व्यासपीठावर मात्र रंगली राजकीय फटकेबाजी

वाघेाली : दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात मराठी- हिंदी गाण्याबरेाबरच राजकीय फटकेबाजी वाघेालीकराना ऐकण्यास मिळाली. सुप्रसिध्द गायक अवधुत गुप्ते व वैशाली सामंत यांनी रंगारंग गाणी सादर केली. तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी जिल्हा परीषद सदस्य मंगलदास बांदल, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रदीप कंद व जिल्हा परीषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यानी राजकीय फटकेबाजी केली. दरम्यान या कार्यक्रमावेळी वाघेाली ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मंचावर उभे करुन त्यांचा प्रचाराचा बॅाम्ब टाकण्यात आला.

ज्ञानेश्वर कटके मित्र मंडळाच्या वतीने तिसऱ्या दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले हेाते. अवधुत गुप्ते व वैशाली सामंत यांनी स्वत: गायलेली विविध चित्रपटातील गाणी, मराठी मालिकांची शीर्षकगीते सादर केली. या पहाट कार्यक्रमासाठी बाजार मैदान खचाखच भरले हेाते. सहा वाजता सुरु झालेला कार्यक्रम दहा वाजता संपला. यावेळी बालचमुनी विविध गाण्यावर नृत्य केले. काही महिलानाही सामंत यानी गाणे गायला लावली. तर गुप्ते यांनी बालचुमत येउन नृत्य केले. कार्यक्रमाच्या मध्यांतरी उपस्थितांचे सत्कार करण्यात आले. यावेळी बेालताना सर्वानीच राजकीय फटकेबाजी केली. या फटकेबाजीने उपस्थितांचे चांगलेच मनेारंजन झाले. याप्रसंगी लेाकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत हेाते.

अशी झाली राजकीय फटाकेबाजी
मंगलदास बांदल --पहिल्या वेळी कटके यांनी कार्यक्रम केला तेव्हा ते ग्रामपंचायत सदस्य हेाते. दुसऱ्या वर्षी जिल्हा परीषद निवडणुकीसाठी त्यांनी 'पहाट' केली. आता तिसऱ्या वर्षी जिल्हा परीषद सदस्य झाले म्हणून.... मग आता चैाथ्या वर्षी पण 'पहाट' होणार ती कशासाठी? असेा एकंदरीतच ही गर्दी पाहता कटके यांच्या मागे जनता आहे. त्यांना विषाची परीक्षा घेण्याची सवय आहे. मात्र ते त्यात पास हेातात करा तुम्ही चौथ्या दिवाळी पहाटची तयारी आम्ही तुमच्या मागे आहोत.

खासदार आढळराव पाटील -- कटके यापुढेही विषाची परीक्षा घेतीलच. पुढच्या वर्षी 'पहाट' करण्याची त्यांची तयारी आतापासुनच सुरु होईल. त्यांची चौथी 'पहाट' होणार म्हणजे बांदल यांचा पत्ता कट हेाणार.

प्रदीप कंद -- मी व बांदल यांच्यात फरक आहे. ते ट्वेंटी ट्वेंटी चे खेळाडु आहेत. तर मी कसोटीचा खेळाडु आहे. ते मैदानात येउन फोर सिक्स मारुन कधी मैदान सेाडून जातात ते कळतच नाही. मी मात्र मैदानावर टिकून राहतो. मैदानात टिकूनच रहावे लागते. त्याशिवाय काही मिळत नाही.

ज्ञानेश्वर कटके -- या पहाट कार्यक्रमासाठी दर वर्षी खासदार आढळराव पाटील आंबेगाव येथुन सकाळी सहा वाजता वाघेालीत येतात. इथे आमचे सरपंचही सकाळी सहा वाजता येत नाहीत.

अन् मीनाकाकींनी भजन सादर केले
कार्यक्रमात गाणे सादर करताना वैशाली सामंत यांच्या सुरात सुर मिळविणाऱ्या काही महिलांनाही माईकवर गाणे सादर करण्यास सामंत यांनी सांगितले. त्यातील एका महिलेने समेार बसुनच गाणे गायलेही. मात्र, सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या मीनाकाकी सातव पाटील यानी मंचावर जाउन भजन सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थित चकित झाले. मात्र, भजनाला उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com