Pune Standing Committee Yogesh Mulik BJP | Sarkarnama

पुणे स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेववक योगेश मुळीक यांची आज बहुमताने निवड करण्यात आली. मुळीक हे दुसऱ्यांना निवडून आले असून, आधी म्हणजे, गेल्या पाच वर्षात ते दोनदा स्थायीचे सदस्य होते. 

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेववक योगेश मुळीक यांची आज बहुमताने निवड करण्यात आली. मुळीक हे दुसऱ्यांना निवडून आले असून, आधी म्हणजे, गेल्या पाच वर्षात ते दोनदा स्थायीचे सदस्य होते. 

अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मुळीक यांना दहा मते पडली तर राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने यांना पाच मते मिळाली. शिवसेनेचा एक सदस्य मतदानासाठी गैरहजर होता. काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ दिली. दरम्यान 'शहर विकासाची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. ती नेटाने पार पाडेन. माझ्या कारकिर्दीत विकासाला प्राधान्य असेल,'' असे मुळीक यांनी सांगितले.

संबंधित लेख