pune sonia gandhi in lilawati to see patangrao | Sarkarnama

अत्यवस्थ पतंगरावांना भेटण्यासाठी सोनिया गांधी 'लीलावती'त! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ असलेले कॉंग्रेस नेते, आमदार पतंगराव कदम यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात आल्या होत्या. 

पुणे: गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ असलेले कॉंग्रेस नेते, आमदार पतंगराव कदम यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात आल्या होत्या. 

पतंगराव कदम यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरु आहेत. सातारा, सांगली जिल्ह्यातील पतंगराव समर्थक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेक नेतेमंडळींनी लीलावतीत येवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सोनिया गांधींनी यापुर्वीच विश्‍वजीत कदम यांना फोन करुन चौकशी केली होती. काल त्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी आज लीलावतीला भेट देवून विचारपूस केली. यावेळी इतर कॉंग्रेस नेतेही उपस्थित होते. 
 

संबंधित लेख