इंदिरा गांधी असत्या तर फार पूर्वीच कॉंग्रेसमध्ये गेलो असतो : शत्रुघ्न सिन्हा 

देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असत्या तर फार पूर्वीच मी कॉंग्रेसमध्ये गेलो असतो, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे खासदार व चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पुण्यात केला.
इंदिरा गांधी असत्या तर फार पूर्वीच कॉंग्रेसमध्ये गेलो असतो : शत्रुघ्न सिन्हा 

पुणे : देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असत्या तर फार पूर्वीच मी कॉंग्रेसमध्ये गेलो असतो, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे खासदार व चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पुण्यात केला. अर्थात आता भाजपमध्ये राहूनच लोकशाही व पारदर्शतकेसाठी लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात सध्या "वन मॅन शो' आणि "टू मॅन आर्मी' अशी परिस्थिती असून हेच लोक देश चालवित असल्याची टीका त्यांनी केली. 

कॉंग्रेसचे पुण्यातील नेते संजय बालगुळे यांनी त्यांच्या वसंतदादा सेवा संस्थेतर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानात सिन्हा बोलत होते. पक्षाचे दोन खासदार होते तेव्हापासून अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करीत आहे. पक्षात आताचे दिवस वेगळे आहेत. लोकशाही व पारदर्शकतेचा अभाव आहे. देशाचे पंतप्रधान परदेशात भाषण देत फिरत आहेत. मात्र या देशातील लोकांना भाषणापेक्षा रोजच्या राशनची जास्त गरज आहे. नोटाबंदीने सामान्यांचे जगणे अवघड होत असताना जीएसटीसारखी कररचना माथी मारण्यात आली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याच्या घोषणेचे काय झाले, असा प्रश्‍न करून केवळ भावनेच्या जाती-धर्माच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 

सत्तेत येणाऱ्या प्रत्येकालाच एक दिवस पायउतार व्हावे लागते. मात्र अहंकार आणि मीपणा माणसाचा ऱ्हास करतो, याचा विचार होणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. लोकांसमोर वस्तुस्थिती मांडणे याला बंडखोरी म्हणत असाल तर मी नक्की बंडखोर आहे, असे सांगत राष्ट्र मंचच्या माध्यमातून देशभर सामान्य जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी जाण्याचा निर्धार व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com