...म्हणून मी कॉंग्रेस सोडली : शरद पवार 

अटलबिहारी वाजपेयी सरकार पडल्यानंतर तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षांनी घेतलेली परस्पर भूमिका मला आवडली नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधून आपण बाहेर पडलो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले.
...म्हणून मी कॉंग्रेस सोडली : शरद पवार 

पुणे : अटलबिहारी वाजपेयी सरकार पडल्यानंतर तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षांनी घेतलेली परस्पर भूमिका मला आवडली नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधून आपण बाहेर पडलो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. 

जागतिक मराठी अकादमीतर्फे श्री. पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजिला होता. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी विचारलेल्या "कॉंग्रेसमधून बाहेर पडताना आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाताना आणि पुन्हा बाहेर येताना आपल्या मनात काय विचार होता,' या प्रशनाला उत्तर देताना ते बोलत होते. 

1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापनेमागची पार्श्‍वभूमी श्री. पवार यांनी या वेळी सांगितली. ते म्हणाले, ""माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरवात कॉंग्रेस विचारधारेतून झाली. मी नेहरूंची विचारधारा कधी सोडली नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी कॉंग्रेसचा लोकसभेतला नेता होतो. राज्यसभेत कॉंग्रेसचे नेतृत्व मनमोहनसिंग यांच्याकडे होते. संसदीय लोकशाहीत एक पद्धत आहे, की पंतप्रधान राजीनामा देईल किंवा अल्पमतात जाईल, त्यावेळी जो अधिकृत विरोधी पक्षाचा नेता आहे, त्याला सरकार बनवायला राष्ट्रपतींनी बोलवायचे असते. वाजपेयी सरकार गेले, त्यावेळी मी किंवा मनमोहनसिंग यांच्यापैकी कोणाला तरी बोलावतील अशी अपेक्षा होती. तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षांनी राष्ट्रपतींना जाऊन आपल्यावतीने "मी सरकारला बनवायला तयार आहे' अशा प्रकारचे पत्र दिले. ते आम्हाला कोणाला आवडलेले नव्हते.'' 

""लोकसभेत किंवा राज्यसभेत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या कोणालाही यत्किंचितही न विचारताच पक्षाच्या अध्यक्षांनी सरकार बनवायची मागणी स्वतःच्या नावाने केली. ही माहिती टेलिव्हिजनवर आम्हाला मिळते, हे माझ्या मनाला पटलं नाही. तिथंच मी निर्णय घेतला आणि बाजूला झालो,'' असे पवार यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com