pune-raju-shetti-peasants-march-delhi | Sarkarnama

फसवले तर शेतकरी सरकारच्या उरावर बसेल : राजू शेट्टी 

संपत मोरे 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

"आता शेतकऱ्याला फसवलं तर तो सरकारच्या उरावर बसेल, मातीत घालेल याचा बोध सरकारने घ्यावा," असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. 

पुणे : "आता शेतकऱ्याला फसवलं तर तो सरकारच्या उरावर बसेल, मातीत घालेल याचा बोध सरकारने घ्यावा," असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. 

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चानंतर ते `सरकारनामा'शी बोलत होते.  ते म्हणाले, "आगामी निवडणुका शेतकऱ्याच्याच प्रश्नावर होतील, राम मंदिर किंवा बाबरी मशीद हा मुद्दा बाजूला पडेल. शेतकऱ्यांचे प्रश्नच केंद्रस्थानी असतील.''

``आजच्या मोर्चातून शेतकऱ्यांनी इशारा दिलाय जो शेतकऱ्यांना फसवेल त्याला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याच प्रस्थापित पक्षांना शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिरापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, की देशभरातील शेतकरी सरकारच्या विरोधात एकवटला आहे. शेतकरी आता जो फसवेल त्याला मातीत गाडेल. शेतकऱ्यांना फसवण्याच्या भानगडीत पडू नका. शेतकरी आता पेटून उठला आहे. आजच्या मोर्चाने शेतकऱ्याची शक्ती सरकारला समजली आहे. ही संघटित शक्ती आता प्रस्थापितांच्या विरोधात आपली ताकद दाखवेल.

संबंधित लेख