pune-rahul-gandhi-narendra-modi-madya-pradesh-election | Sarkarnama

`बेटी पढाओ और बेटी को बीजेपी के एमएलए सें बचाओ'; राहुल गांधी मोदींवर बरसले

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशातील दतिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, `बेटी बचाओ बेटी पढाओ'च्या नाऱ्याची खिल्ली उडवली आणि महिला आणि मुली भाजपपासूनच असुरक्षित असल्याचे सूचित केले. 

पुणे : मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांवर तोफा डागायला लागले आहेत. 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशातील दतिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, `बेटी बचाओ बेटी पढाओ'च्या नाऱ्याची खिल्ली उडवली आणि महिला आणि मुली भाजपपासूनच असुरक्षित असल्याचे सूचित केले. 

गांधी म्हणाले, की मोदींनी दिलेला `बेटी बचाओ बेटी पढाओ'चा नारा आम्हाला साऱ्यांनाच चांगला वाटला. परंतु, भाजपचा आमदारच एखाद्या महिलेवर बलात्कार करतो. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बलात्कार करणाऱ्या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मोदीही या बलात्कार करणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी करत नाहीत. ते कधीही याबाबत चकार शब्द काढत नाहीत. त्यामुळे `बेटी पढाओ और बेटी को बीजेपी के एमएलए सें बचाओ' असाच हा खरा नारा आहे.

संबंधित लेख