pune-prayer-meeting-ex-pm-atal-bihari-vajpayee | Sarkarnama

सर्वसामान्यांच्या हृदयात वाजपेयींचे स्थान : पंतप्रधान मोदी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आशियाई खेळामध्ये काल सुवर्णपदक मिळवले. पुनियाने मिळालेले सुवर्णपदक भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले. जीवनाची यापेक्षा मोठी सफलता असू शकत नाही. 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा गेल्या दहा वर्षांपासून राजकीय मंचावर वावर नव्हता. सार्वजनिक जीवनापासून ते दूरच होते. मात्र, सर्वसामान्यांच्या हृदयात त्यांनी जागा मिळवली होती. त्यांना निरोप देताना झालेली अलोट गर्दी, याची साक्ष होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आज श्रद्धांजली वाहिली. 

कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आशियाई खेळामध्ये काल सुवर्णपदक मिळवले. पुनियाने मिळवलेले सुवर्णपदक भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले. जीवनाची यापेक्षा मोठी सफलता असू शकत नाही, असेही त्यांनी आवर्जुन नमूद केले. 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दिल्लीत आयोजिलेल्या सर्वपक्षीय सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या वेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्नाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे दहशतवाद चर्चेत आला. यामुळे जागतीक पातळीवर काश्मीर प्रश्नाचे कथानकच बदलले, असेही त्यांनी सांगितले. वाजपेयी यांचा स्वतःवर, सर्वसामान्यांवर विश्वास होता. ते थांबले नाहीत. अडखळले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. 

पोखरण अणुचाचणी, छत्तीसगडसह तीन राज्यांच्या निर्मितीमध्ये वाजपेयींची कणखरता अनुभवास आली, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख