pune-prakash-javadekar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

`त्या' वक्‍तव्याबद्दल जावडेकरांकडून माफी नाहीच; केवळ शब्द मागे घेतले 

उमेश घोंगडे
रविवार, 16 सप्टेंबर 2018

दोन दिवसापूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शाळांसंबंधी बोलताना वापरलेला `भिकेचा कटोरा' हा शब्द चुकीचा असून तो शब्द मागे घेत असल्याचे केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून आज स्पष्ट करण्यात आले. या संबंधीचे निवेदन जावडेकर यांनी प्रसिद्धीस दिले.

पुणे : दोन दिवसापूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शाळांसंबंधी बोलताना वापरलेला `भिकेचा कटोरा' हा शब्द चुकीचा असून तो शब्द मागे घेत असल्याचे केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून आज स्पष्ट करण्यात आले. या संबंधीचे निवेदन जावडेकर यांनी प्रसिद्धीस दिले. मात्र चुकीचा शब्द मागे घेण्यालिकडे दिलगिरी किंवा माफी मागण्याचा मनाचा मोठेपणा जावडेकर यांनी दाखविला नाही, हे विशेष. 

मला पेट्रोल दरवाढीची झळ बसत नाही. कारण मला ते सरकारकडून मिळते या वक्‍तव्यावरून अडचणीत आलेल्या केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज तत्काळ माफी मागितली. मात्र जावडेकर यांनी केवळ चुकीचा शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चुकल्याचे मान्य केल्यावर माफी मागण्यात कमीपणा वाटण्याचे कारण काय ? असा प्रश्‍न या संदर्भात करण्यात येत आहे.

दरम्यान, जावडेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने आज पुण्यात निदर्शने करण्यात आली. गणपती बप्पा जावडेकरांना बुद्धी दे, शिक्षण हक्काची जाण दे, अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने उद्या (ता.17) दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जावडेकर यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.केवळ शब्द मागे घेऊन चालणार नाही, तर जावडेकर यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, असे पक्षाचे युवक नेते प्रदीप देशमुख यांनी सांगितले. जावडेकर यांच्यासारख्या जेष्ठ मंत्र्यांनी अशाप्रकारे भाषा वापरणे योग्य नाही. देशाच्या संपूर्ण शिक्षण विभागाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांनी या प्रकारे बोलणे योग्य नाही. त्यामुळे शब्द मागे घेतले असले तरी त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, असे देशमुख यांनी सांगितले. 

 

संबंधित लेख