pune nilesh rane challenges prakash ambedkar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर तुमच्यात दम आहे कां? : नीलेश राणे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 मे 2018

भारीप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नारायण राणेंवर टीका केल्याने त्यांचे पुत्र, माजी खासदार नीलेश राणे चांगलेच संतापले आहेत. आंबेडकरांनी समोरासमोर येवून चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी "आपल्या भाषेत' दिले आहे. 

पुणे: भारीप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नारायण राणेंवर टीका केल्याने त्यांचे पुत्र, माजी खासदार नीलेश राणे चांगलेच संतापले आहेत. आंबेडकरांनी समोरासमोर येवून चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी "आपल्या भाषेत' दिले आहे. 

राणे यांनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. त्याला उत्तर म्हणून नीलेश राणे यांनी ट्‌वीट केले आहे. राणेसाहेबांबरोबर समोरासमोर चर्चा करण्याचा दम आहे कां? हा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. आंबेडकर कोपर्डीच्या घटनेवेळी गपगार गार होते, कोरेगाव भीमावेळी जीवंत झाले. घरी बसून आंदोलन करणारे आंबेडकर संभाजी भिडेंना एक दिवसही तुरुंगात टाकू शकले नाहीत, असेही राणे यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख