Pune news - Sharad Pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शरद पवार 'तो' शब्द पाळणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आज हवामान विभागाला बारामतीची साखर मिळणार आहे. गेल्या शनिवारी दिलेला शब्द आज ते पाळणार आहेत.

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आज हवामान विभागाला बारामतीची साखर मिळणार आहे. गेल्या शनिवारी दिलेला शब्द आज ते पाळणार आहेत.

शरद पवार यांनी `हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन' असे वक्तव्य केले होते. हवामान खात्याच्या अंदाजानंतर पाऊस पडल्याने आज बारामतीची साखर हवामान खात्याला मिळणार आहे! बारामतीहून पाठवलेली साखर दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी हवामान विभागातील अधिकाऱयांना भरवणार आहेत. त्यासाठी ही साखर पुण्यात पोचली आहे.       

प्रसार माध्यमांसमोर शनिवारी बोलताना शरद पवार यांनी, "राज्यात पाऊस होण्यासंबधीचा हवामान तज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' अशी प्रतिक्रिया दिली होती. बारामतीच्या साखरेच्या गोडीची खरच मेघराजाला भुरळ पडली आणि राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. 

देशात यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय, अशी भीती व्यक्त होत होती. हवामान खात्याने गेल्या आठवड्यात पावसासंबंधी व्यक्त केलेले अंदाजात आणि परिस्थितीत तफावत आढळली होती. त्यानंतर तर हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यावरून हवामान खात्याची खिल्लीही उडवण्यात. 

शरद पवार यांना याबाबत बारामतीत प्रश्‍न विचारल्यानंतर अंदाज खरा ठरल्यास त्यांनी बारामतीची साखर ऑफर केली. हवामान खात्यासाठी हा टोमणा होता. पवार यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत हवामान खात्याची `कार्यक्षमता` उघड केली होती. 

संबंधित लेख