pune news -Race in RPI for leadership | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आरपीआयच्या गटनेते पदासाठी पुण्यात चढाओढ 

मंगेश कोळपकर
रविवार, 2 जुलै 2017

पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पुणे महापालिकेतील चार नगरसेवकांमध्ये  गटनेतेपद मिळविण्यासाठी आता चढाओढ सुरू झाली आहे.

पक्षाचे पाच सदस्य यंदाच्या महापालिका निवडणुकीत निवडून आले. त्यातील नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद मिळाले. परंतु, त्यांचे अकाली निधन झाल्यावर त्या जागेवर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची निवड झाली. तत्पूर्वी पक्षाचे गटनेते म्हणून डॉ. धेंडे यांची निवड निश्‍चित झाली होती. परंतु, कांबळे यांच्या निधनामुळे अनपेक्षितपणे ते उपमहापौर झाले. त्यामुळे आता रिक्त असलेल्या गटनेते पदासाठी पक्षात चुरस सुरू झाली आहे. 

फर्जाना शेख, सुनीता वाडेकर आणि सोनाली लांडगे या गटनेतेपदासाठी इच्छूक असल्याची पक्षात चर्चा आहे. माजी नगरसेवक अयूब शेख यांच्या फर्जाना या पत्नी आहेत तर, आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते परशुराम वाडेकर हे त्यांची पत्नी सुनीतासाठी प्रयत्नशील आहेत. खरे तर, उपमहापौरपदावर संधी मिळावी म्हणून वाडेकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.

पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, तसेच शहराध्यक्ष यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या होत्या. परंतु, त्यांचे उपमहापौरपद हुकले त्यामुळे ते नाराज झाले आहेत. पक्षाने या पूर्वी कांबेळे त्यानंतर डॉ. धेंडे यांना संधी दिली. वाडेकर आता गटनेतेपद मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. परंतु, कांबळे, वाडेकर आणि धेंड हे बौद्ध समाजाचे आहेत. मातंग किंवा मुस्लीम समाजाला संधी देण्यासाठी लांडगे किंवा शेख यांची निवड व्हावी, असे कार्यकर्त्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे. बौद्ध समाजाला सत्तेचे पद मिळाले आहे. मातंग, मुस्लीम समाजाने किती दिवस वाट पहायची, असेही ते म्हणतात. त्यामुळे पक्षाध्यक्ष आठवले आता काय निर्णय घेणार, याकडे रिपब्लिकन चवळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांना स्वतंत्र गटनेतेपद देता येणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे म्हणणे आहे. परंतु, पालकमंत्र्यांनी रिपब्लिकनच्या गटाचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करून देतो, असे आश्‍वासन दिले आहे. त्यावर भिस्त ठेवून हा सगळा खटाटोप चालला आहे. 

संबंधित लेख