Pune news - Corporator Kiran Dagade Patil on Bavdhan election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच माझ्याविरोधात आरोप - नगरसेवक दगडे पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 सप्टेंबर 2017

``मी कुठल्याही प्रकारची अडवणूक केली नसून, उलट माझी स्वतःची कचरा गाडी बावधनचा पूर्ण कचरा उचलत आहे. अनेक विकास कामे मी करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे," असे बावधन-कोथरुडचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

पुणे - ``मी कुठल्याही प्रकारची अडवणूक केली नसून, उलट माझी स्वतःची कचरा गाडी बावधनचा पूर्ण कचरा उचलत आहे. अनेक विकास कामे मी करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे," असे बावधन-कोथरुडचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

"माननीयां'च्या पत्नीप्रेमामुळे बावधनवासियांच्या तोंडचे पाणी पळाले!' या मथळ्याखाली `सरकारनामा'मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात नगरसेवक दगडे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नगरसेवक दगडे पाटील यांनी कळवले आहे, की बावधन बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. उलट लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आता तो उघडकीस येईल याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची खोटी माहिती सांगत आहे. त्यांनी जाणूनबुजून महापालिकेचा पाण्याचा टॅक्स भरला नाही. निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी २५ लाखांचे बेंच वाटून त्यातही भ्रष्टाचार केला. ते भारतीय जनता पार्टी व माझी निवडणुकीमध्ये बदनामी करून लोकांची फसवणूक करत आहे. आता त्यांना त्यांचा पराभव नजरेसमोर दिसू लागल्यामुळे ते सध्या बिनबुडाचे आरोप करत आहेत." 

``निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय. यांनी अधिकृत पुरस्कृत केले आहे समोरचे पॅनेलला कुठलाही अधिकृत पुरस्कृत केलेले नसताना ते भारतीय जनता पार्टीचे नाव वापरात आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत,'' असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख