Pune news-congress fasts for separate corporartion | Sarkarnama

पुण्यात आणखी एका महापालिकेसाठी काॅंग्रेसचे उपोषण 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे : पुणे शहरालगतच्या 34 गावांचा महापालिकेत समावेश न करता त्यांची स्वतंत्र महापालिका करावी, या मागणीसाठी शहर कॉंग्रेसतर्फे महापालिकेसमोर शुक्रवारी उपोषण करण्यात आले. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त कुणाल कुमार यांनाही पक्षाने निवेदन दिले.
 
34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार अनंत गाडगीळ, अभय छाजेड, संजय बालगुडे, श्रीकांत शिरोळे, मुकारी अलगुडे, सदानंद शेट्टी आदींसह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या इमारतीसमोर दिवसभर उपोषण केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "महापालिकेचा सध्याचा विस्तार 250 चौरस किलोमीटरचा आहे. 34 गावांचा समावेश केल्यास ही हद्द 500 चौरस किलोमीटर होईल. या गावांचा विकास करण्याची महापालिकेची क्षमता नाही. त्यासाठीची तरतूद महापालिकेकडे नाही. त्यामुळे या गावांची नवी महापालिका करण्यात यावी. तसेच गावांचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेवर लादल्यास त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.' 

संबंधित लेख