PUNE nayana gunde new md pmpml | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

तुकाराम मुंढेंच्या निर्णयांचा अभ्यास करुन सुधारणा करणार : IAS नयना गुंडे 

उमेश घोंगडे 
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमल) सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्याबरोरच तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख योजना आणि निर्णयांचा अभ्यास करून योग्य त्या सुधारणा आपण सुरू ठेऊ, असे "पीएमपीएमएल'च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले. 

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमल) सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्याबरोरच तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख योजना आणि निर्णयांचा अभ्यास करून योग्य त्या सुधारणा आपण सुरू ठेऊ, असे "पीएमपीएमएल'च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले. 

गुंडे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज स्वीकारली त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तुकाराम मुंढे यांची अचानक बदली झाल्यानंतर गुंडे यांची "पीएमपीएमएल'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आपला भर राहील, असे त्या म्हणाल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत व्यापक प्रसार करण्यासाठी काही उपाययोजना करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरीकांसाठी विशेष सोय करता येईल का या बाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

तुकाराम मुंढे यांनी केलेल्या विविध योजना आणि सुधारणा तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईच्या अनुषांगाने विचारले असता, मुंढे यांनी घेतलेले निर्णय आणि योजनांबाबत अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांनी ज्या तडफेने "पीएमपीएमएल'चा कारभार चालवला होता त्याच्याशी गुंडे यांच्या कामाची तुलना होणार असल्याने नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर गुंडे या सावध पावले टाकतील, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंडे यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केलेली भूमिका मिळती-जुळती आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांवर मुंढे यांच्या काळात कारवाई झाली. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी कर्मचारी सक्रिय झाले आहेत. नव्या अध्यक्षांना विश्‍वासात घेऊन कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात नक्की यश मिळेल, असा विश्‍वास काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. या पार्श्‍वभूमीवर या कर्मचाऱ्यांबाबत गुंडे काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
 

संबंधित लेख