Pune Municipal Corporation NCP Ajit Pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पुणे मनपातील गटनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलाखती

उमेश घोंगडे
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे : गटनेतेपदी संधी मिळावी यासाठी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 13 इच्छुकांनी रविवारी मुलाखती दिल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत या मुलाखती झाल्या. राष्ट्रवादीचा गटनेता हा पालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहणार आहे. या पदावर अंतीम निवडीचे आधिकार अजित पवार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उद्या (ता.6) रोजी नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

पुणे : गटनेतेपदी संधी मिळावी यासाठी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 13 इच्छुकांनी रविवारी मुलाखती दिल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत या मुलाखती झाल्या. राष्ट्रवादीचा गटनेता हा पालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहणार आहे. या पदावर अंतीम निवडीचे आधिकार अजित पवार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उद्या (ता.6) रोजी नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

मागीला दहा वर्षे महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश आले आहे. या निवडणुकीत पक्ष दुसऱ्या स्थानावर पोचला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे भाजपला मिळणार असून विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेक इच्छुकांची जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. पालिका निवडणुकीत मोठा पराभव झाल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेले होते. रविवारी पुन्हा पुण्यात आलेल्या पवार यांनी पालिकेत विजयी झालेल्या नगरसेवकांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली. रविवारी सकाळी बारामती होस्टेल येथे ही बैठक झाली. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार बापू पठारे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला हजर होते. 

या बैठकीत महापालिकेत यापुढील काळात पक्षाचा अजेंडा काय असला पाहिजे, पुणेकरांचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे,अशा विविध विषयांवर या बैठकीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. पालिकेत राष्ट्रवादीला एवढ्या मोठ्या प्रमाणात फटका बसेल, असे वाटले नव्हते, अशी कबुली पवार यांनी बैठकीत दिली.

पुढील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आतापासूनच कामाला सुरुवात करा, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. पालिकेत पक्षाचा गटनेता म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा नगरसेवकांनी व्यक्त केली. यामध्ये विद्यमान महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, अश्विनी कदम, चेतन तुपे, ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह नंदा लोणकर, रेखा टिंगरे यांनी मुलाखती दिल्या. पक्षाचा गटनेता ठरविण्याचे सर्वाधिक अजित पवार यांना देण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

संबंधित लेख