`त्या' 833 उमेदवारांना राज ठाकरेंचा दिलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे नोकरी गमवावी लागलेल्या ८३३ उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी उमेदवारांना दिले.
`त्या' 833 उमेदवारांना राज ठाकरेंचा दिलासा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे नोकरी गमवावी लागलेल्या ८३३ उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी उमेदवारांना दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्यानंतरही शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर अभियंत्यांवर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने 'सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक' पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे अभियंते अडचणीत आले आहेत. राज्य शासनाने न्यायालयात योग्यप्रकारे बाजू न मांडल्याने इतक्या मोठ्या संख्येने अभियंत्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

सहायक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते. अवजड मोटर वाहन चालविण्याचा परवाना आणि सरकारी गँरेंजमधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते. मात्र हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले. या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले. त्या आधारे जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली गेली. मात्र असे नियम बदलण्यास न्यायालयात आक्षेप घेतला गेला. पूर्वीच्या निकषांमुळे शासनाला आवश्यक त्या संख्येने उमेदवार मिळत नव्हते. तसंच खोटी प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकार उघडकीस आले होते. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने नियमामध्ये बदल केला होता.' असे बदल करण्याची गरज का भासली?' हे शासनातर्फे न्यायालयात योग्य प्रकारे मांडले गेले नाही. त्यामुळे केवळ याचिकाकर्त्याची बाजूच न्यायालयासमोर आली, असे या  अभियंत्यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणले.

या सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा, न्याय मिळावा म्हणून या सर्व उमेदवारांनी आज मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भेटावयास आलेल्या उमेदवारांचे सर्व म्हणणे ऐकून ठाकरे यांनी या नोकरभरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे आश्वासन त्यांनी उमेदवारांना दिले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com