pune-mega-recruitment-maratha-reservation | Sarkarnama

मेगा भरती : मराठा समाजाच्या वाट्याच्या जागा इतरांना देणार नाही : मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा समाजाचा संभ्रम दूर करूनच मेगा भरती करण्यात येईल. या भरतीतील मराठा समाजाच्या वाट्याच्या जागा इतरांना देण्यात येणार नाहीत, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 

पुणे : मराठा समाजाचा संभ्रम दूर करूनच मेगा भरती करण्यात येईल. या भरतीतील मराठा समाजाच्या वाट्याच्या जागा इतरांना देण्यात येणार नाहीत, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 

मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीनंतर झालेल्या निर्णयाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. `मेगा भरती होऊन गेली तर आम्हाला संधी मिळणार नाही, असा संभ्रम मराठा समाज, संघटनांमध्ये निर्माण झाला आहे,' असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला अश्‍वत्थ करताना, `हा संभ्रम दूर करूनच भरती केली जाईल,' असे आश्‍वासन दिले. 

मेगा भरतीमध्ये अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीयांचीही भरती सुरू आहे. यांची भरती झाली पाहिजे. त्याला मराठा समाजाचा विरोध नाही. मात्र आमच्या जागांचे काय होणार, असा संभ्रम मराठा समाजामध्ये आहे. त्यांचा हा संभ्रम दूर करूनच ही भरती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख