pune-maratha-reservation-udayanraje-bhosale | Sarkarnama

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास उद्रेक : उदयनराजे भोसले 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 ऑगस्ट 2018

"आरक्षणासाठी उद्रेक झाला, तर लोक ऐकणार नाहीत. हात जोडून विनंती करतो, की त्यातून मार्ग काढा. अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे दिला. 

पुणे : "आरक्षणासाठी उद्रेक झाला, तर लोक ऐकणार नाहीत. हात जोडून विनंती करतो, की त्यातून मार्ग काढा. अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे दिला. 

मराठा आरक्षण परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आरक्षणाच्या मागणीला 30 वर्षे झाली. आता अंत पाहू नका. राजकारणी, न्यायव्यवस्था आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. दबाव आला तरच आरक्षण देणार का ? आरक्षण देत नाही असे तरी सांगा. देणार असाल तर तसे तरी सांगा. मराठा समाजावर नक्षलवादी बनण्याची वेळ आणू नका. आरक्षणासारख्या प्रश्‍नाला नॉन-इश्‍यू बनवू नका. तसे धाडस करू नका. 

परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. कायद्याचे कारण पुढे करत आरक्षण रखडवू नका. आचारसंहितेचे कारण देऊ नका. आत्महत्या थांबल्या पाहिजेत. आरक्षण द्या. सर्व सुरळित होईल, असेही त्यांनी सांगितले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख