pune-maratha-reservation-agitation-restart-from-monday | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी सोमवारपासून पुण्यात चक्री उपोषण 

उमेश घोंगडे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने येत्या सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणाच्या मुख्य मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. नऊ ऑगस्टला बंद आणि आंदोलनादरम्यान राज्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामुळे यापुढे रस्त्यावरचे आंदोलन न करण्याचा निर्णय मोर्चाने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर चक्री उपोषण आंदोलन सुरू करण्यात येत आहे. 

आरक्षणाबरोबरच विविध प्रकारच्या 15 मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज गेल्या एक वर्षापासून आंदोलन करीत आहे. मूक मार्चा, महाराष्ट्र बंद तसेच धरणे आंदोलन या माध्यमातून मराठा समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे चक्री उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नऊ ऑगस्ट रोजी घडलेल्या हिंसाचारात अटक केलेल्या तरुणांचा जामीन मंजूर करावा आणि त्यांना दोषमुक्त करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हिंसाचारात झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई देण्यास मराठा क्रांती मोर्चा तयार असल्याचे यावेळी शांताराम कुंजीर यांनी सांगितले. 

दरम्यान, च्रकी उपोषण राज्यभर टप्याटप्याने होणार असून, पुण्यात सोमवारपासून (ता.20) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालणार आहे. या आंदोलनात हिंसाचार होऊ नये यासाठी आचारसंहिता ठरविण्यात आल्याचे यावेळी शांताराम कुंजीर यांनी सांगितले. 

संबंधित लेख