PUNE LOKSABHA CONSTITUNCY : NCP CLAIM | Sarkarnama

पुण्याचा खासदार आपला हवा, ही अजितदादांची इच्छा २०१९ मध्ये पूर्ण होणार? चव्हाण, जगताप, पठारे संभाव्य नावे!

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे : सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेसवर हल्ला करीत, या पक्षाच्या गोटात खळबळ उडवून दिली. पुणे लोकसभेच्या जागेवर हक्क सांगत, राष्ट्रवादीचा खासदार होईल, अशी घोषणाही पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पुण्यात केली. तेव्हा, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी नेमकी कोणती गणिते जुळविणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पुण्यात काॅंग्रेसकडे सध्या सक्षम उमेदवार नसल्याचा दावा करत राष्ट्रवादीला पही जागा हवी आहे. पण त्यांच्याकडे चेहरा कोण, याची चाचपणी केली असता तीन-चारच नावे पुढे आली. त्यातही विद्यमान खासदार आणि पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर प्रशांत जगताप, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे आदी नावांची चर्चा आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे म्हणूनच मी या मतदारसंघावर दावा केल्याचे अजित पवार यांनी आज पुन्हा स्पष्ट केले. याचा अर्थ राष्ट्रवादीने हा लोकसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

``राष्ट्रवादीने या शहरासाठी खूप काम केलं आहे. आमची ताकद जास्त आहे, त्यामुळं इथं लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. आघाडी होईल की नाही हे वरीष्ठ ठरवतील, पण आज मी राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे आजचा विचार करणार. आमच्याकडे पुण्यासाठी सक्षम उमेदवार आहे, उमेदवार असल्याशिवाय मी बोलणार नाही,` अशा शब्दांत त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

अर्थात अजित पवार यांना पुण्यात आपला खासदार हवा आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या समर्थकांनी आघाडीचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या प्रचाराचे काम केले नव्हते. त्यावेळी खुद्द शरद पवार यांना हस्तक्षेप करावा लागला होता. पुण्यात पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीचा खासदार का नको, असा तेव्हा त्यांचा सवाल होता. आताही त्यांची ही जुनी इच्छा त्यांनी बोलून दाखविली. आता खरोखरीच त्यांची ही बोच २०१९ मध्ये दूर होणार का आणि काॅंग्रेस त्यांना ही जागा देणार का, हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.

संबंधित लेख