pune kunaljumar transferr issue | Sarkarnama

पावणे चार वर्षे ठाण मांडून बसलेल्या कुणालकुमारांच्या बदलीची चर्चा 

उमेश घोंगडे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुण्याचे महापालिका आयुक्त कुणालकुमार यांच्या बदलीची चर्चा पुन्ही सुरू झाली आहे. त्यांच्या बदलीचा निर्णय झाला असून बदलीचे आदेश लवकरच मिळतील, असे सांगण्यात येत आहे.

पुणे : पुण्याचे महापालिका आयुक्त कुणालकुमार यांच्या बदलीची चर्चा पुन्ही सुरू झाली आहे. त्यांच्या बदलीचा निर्णय झाला असून बदलीचे आदेश लवकरच मिळतील, असे सांगण्यात येत आहे. कुमार यांना महापालिकेच्या सेवेत सुमारे पावणेचार वर्षे झाली. गेल्या वर्षभरात त्यांच्या बदलीची चर्चा अनेकवेळा झाली. मात्र प्रत्यक्षात बदली झाली नाही. त्यामुळे यावेळीदेखील नुसतीच चर्चा होणार की खरोखरच बदली होणार याबाबत महापालिका वतुळात उत्सुकता आहे. 

महापालिकेत आयुक्त म्हणून आल्यापासून आयुक्त कुमार हे केंद्र व राज्य सरकारच्या कलाने काम करतात असा आरोप महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने सातत्याने केला होता. गेल्या एक वर्षापासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सोयीने आयुक्त निर्णय घेतात, असा आरोपदेखील करण्यात येतो. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी अनेक विषयांवरून आयुक्तांचे मतभेद होतात. मात्र राज्य सरकारमध्ये आयुक्तांचे चांगले वजन असल्याने आयुक्त पदाधिकाऱ्यांनाही गृहीत धरून काही निर्णय घेतात, अशी काही सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची भावना बनली आहे. कोणत्याही प्रश्‍नात आधिकारी पक्षातील किंवा सत्तेतील वरिष्ठांशी संपर्क साधतात. त्यामुळे महापालिका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना न जुमाण्याची आधिकाऱ्यांची मानसिकता अधिक घट्ट होत जाते, असे महापालिकेतील एका पदाधिकाऱ्यांसी सांगितले. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर कुमार यांची बहुचर्चित बदली झाल्याची चर्चा आज महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली. महापालिकेचे आज वार्षिक अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुडे मांडण्यात आले. त्यामुळे बहुसंख्य नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान बदलीची बातमी व्हायरल झाल्याने या चर्चेला चांगलाच जोर आला होता. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त कुणालकुमार यांनादेखील बदलीचे वेध लागले आहेत. पुण्यात सुमारे पावणेचार वर्षे होत आली असल्याने त्यांनाही बदली झाली तर हवीच आहे. 

संबंधित लेख