आपल्याला लाभलाय "तोतया पंतप्रधान' : कुमार केतकर 

पुण्यावर तोतया पेशवाव्यानी तीन वर्षे राज्य केले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला तोतया पंतप्रधान लाभला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आज पुण्यात केली. ही तोतयागिरी संपवण्यासाठी येत्या निवडणुकीत सर्वांनी जागृत राहण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
आपल्याला लाभलाय "तोतया पंतप्रधान' : कुमार केतकर 

पुणे : पुण्यावर तोतया पेशवाव्यानी तीन वर्षे राज्य केले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला तोतया पंतप्रधान लाभला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आज पुण्यात केली. ही तोतयागिरी संपवण्यासाठी येत्या निवडणुकीत सर्वांनी जागृत राहण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आज पुण्यात व्यक्त केले. 

पुण्यातील कॉंग्रेस नेते संजय बालगुडे यांच्या वसंतदादा सेवा संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानात केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणावर सडकून टीका केली. गेल्या चार वर्षात देशाच्या सर्व पातळ्यांवर नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंळातील मंत्री हे केवळ रबर स्टॅम्प असून पंतप्रधान कार्यालय संपूर्ण देश चालवित आहे. रिझर्व्ह बॅंक, रिझर्व्ह र्बंकेचे गव्हर्नर, नियोजन आयोग यासारख्या संस्थांचे मोदी यांनी अवमूल्यन केले आहे. एकप्रकारे देशाचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. देशातील वृत्तपत्र समूहदेखील मोदींनी अर्थिक लालच दाखवून गुलाम बनविले आहेत. पत्रकार गुलाम नाहीत. मात्र वृतपत्र समूहाचे मालक, संपादक हे गुलाम बनले आहेत, अशी टीका केतकर यांनी केली. 

अनेक परदेश दौरे केल्यानंतरही परराष्ट्र धोरणात मोदींना साफ अपयश आले असून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत जाण्यासाठी आपल्या देशाला कुणीही मदत केली नाही, हे मोदींचे मोठे अपयश आहे. मीडिया 2002 च्या गुजरात दंगलीच्यावेळी अटलबविहारी वाजपेयी मोदी यांना कडाडून विरोध केला होता. मात्र अडवाणी यांनी त्यांची पाठराखण केली. तेच मोदी आता अडवाणींना विचारतदेखील नाहीत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com