pune : Khadkwasla canal | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

पुणेकरांना झाली पानशेत प्रलयाची आठवण : खडकवासला कालवा फुटला

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुणे : खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटल्याने पुणेकरांना पानशेत प्रलयाची आज आठवण झाली. या कालव्यातून इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू होते. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. दांडेकर पुलानजिक कालव्याला मोठे भगदाड पडल्याने त्यातील पाणी शेजारील झोपडपटट्यांत शिरले. परिणामी तेथे एकच घबराट उडाली.

पुणे : खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटल्याने पुणेकरांना पानशेत प्रलयाची आज आठवण झाली. या कालव्यातून इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू होते. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. दांडेकर पुलानजिक कालव्याला मोठे भगदाड पडल्याने त्यातील पाणी शेजारील झोपडपटट्यांत शिरले. परिणामी तेथे एकच घबराट उडाली.

पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर अशीच घबराट उडाली होती. त्यानंतरही बेबी कॅनाॅल वाहून गेला होता. आता या कालव्यासंदर्भात तिसऱ्यांदा दुर्घटना घडली आहे. हा कालवा फुटल्याने अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले. लाखो लिटर पाणी वाया गेले. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक पूर्ण थांबविण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. 
अचानक आलेल्या या जलसंकटामुळं झोपडपट्ट्यांत पाणी शिरले. अनेकांचे होते नाही ते वाहून गेले. संतप्त रहिवाशांनी महापौर मुक्ता टिळक यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हा कालवा रात्री फुटला असता तर आणखी धोकादायक झाले असते. प्रशासन झोपले होते का, असे सावल त्यांनी केले.  दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

हा कालवा बंद करून वाहिनीद्वारे पाणी देण्याचा जुना प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र तो खर्चिक असल्याने त्यावर विचार होत नाही. हा कालवा अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थितीत आहे. भराव जीर्ण झाले असल्याने ते केव्हाही फुटण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळेच यावर कायमस्वरूपी उपाय भविष्यात शोधावाच लागणार असल्याची स्थिती आहे.

संबंधित लेख