pune jitendra aawhad on purandare shivsrushti | Sarkarnama

पुरंदरेंच्या शिवसृष्टीत 'दादोजी कोंडदेव' असतील; ती मान्य नाही : जितेंद्र आव्हाड 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे : जिजामाऊलींची बदनामी करणाऱ्या ब. मो. पुरंदरे यांना "महाराष्ट्र भूषण' देऊन या सरकारने तमाम शिवप्रेमींना जखम केलीच होती, आता 300 कोटी देऊन त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकारने केले आहे. या शिवसृष्टीच्या माध्यमातून ब. मो. पुरंदरे हे खोटा इतिहासच मांडून राजमातेची बदनामी करतील. त्यामुळे आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. ही शिवसृष्टी आम्हाला मान्य नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

पुरंदरेंनी आपल्या लिखाणातून कायम मॉंसाहेब आणि शिवाजी महाराजांची बदनामी केली. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण द्यायला आम्ही विरोध केला होता. महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर मनुवाद्यांचं हे सरकार शांत राहिल, असे वाटलं होतं. पण मनुवादी काही शांत बसायला तयार नाहीत. आणि आता 300 कोटी रूपये देण्याचे जाहीर करून एक काल्पनिक शिवसृष्टी ज्या मध्ये दादोजी कोंडदेव असतील; मॉसाहेबांची बदनामी असेल; तो सगळा विकृत इतिहास असेल जो महाराष्ट्राने कधीच स्वीकारला नाही. आमच्या नवीन पोरांनी खरा इतिहास शोधला आहे. त्या खऱ्या इतिहासात पुरंदरेचा खोटा इतिहास कुठेच दिसत नाही. असा चुकीचा इतिहास ब. मो. पुरंदरेंनी महाराष्ट्रासमोर ठेऊन महाराष्ट्राला विकृत इतिहासाची ओळख करून दिली. त्यांना महाराष्ट्र भूषण देऊन आधीच तुम्ही आमच्या हृदयावर जखमा करून ठेवल्या होत्या. आज त्यातून शिवसृष्टी उभारावी म्हणून तुम्ही ब. मो. पुरंदरेंना 300 कोटी रूपये देत असाल तर हे अति झालं आहे. महाराष्ट्र आता शांत बसणार नाही, असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

संबंधित लेख