बापटांच्या लग्नकार्याला पवार, फडणवीस, गडकरींची हजेरी! 

पालकमंत्री गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव यांच्या विवाह सोहळ्यात आशिर्वाद देण्यासाठी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी दिग्गज नेत्यांची मांदीयाळी बुधवारी जमली. सकाळी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला राज्याचे जवळपास सारे मंत्रीमंडळ उपस्थित होते.
बापटांच्या लग्नकार्याला पवार, फडणवीस, गडकरींची हजेरी! 

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव यांच्या विवाह सोहळ्यात आशिर्वाद देण्यासाठी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी दिग्गज नेत्यांची मांदीयाळी बुधवारी जमली. सकाळी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला राज्याचे जवळपास सारे मंत्रीमंडळ उपस्थित होते. 

पालकमंत्री बापट यांचे चिरंजीव गौरव यांचा विवाह भारतीय जनता पक्षाच्या सांगली येथील नगरसेविका नीता केळकर यांच्या कन्या स्वरदा केळकर यांच्याशी आज मोठ्या थाटामाटात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जवळपास सारे मंत्रीमंडळ व बहुसंख्य आमदार उपस्थित होते. भाजपचे प्रमुख पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी या विवाहाला उपस्थित होते. 

सकाळी साडेदहा वाजता विवाह होता. विवाह समारंभाच्या ठिकाशी चोख व्यवस्था करण्यात आली होती. आज विवाह झाला असला तरी राजकीय कार्यकर्ते व सर्वसामान्यांसाठी स्वागतसमारंभ येत्या 25 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com