Pune : Eight Judges transferred | Sarkarnama

जिल्ह्यातील आठ न्यायाधीशांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

एस. के. एस. रझवी, के. के. जहागीरदार, आर. एन. सरदेसाई, पी. सी. भागुरे, एन. के. ब्रह्मे, ए. के. पाटील, ए. के. शाह, एस. एच. ग्वालानी यांची पुण्यात बदली झाली आहे

पुणे : उच्च न्यायालयाने राज्यातील विविध न्यायालयांतील 131 जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बदल्या केल्या असून, पुणे जिल्ह्यातील आठ न्यायाधीशांचा यात समावेश आहे. 

पुण्यातील जे. टी. उत्पात, एल. एल. येनकर, डी. डी. देशमुख, एस. के. कऱ्हाळे, एस. व्ही. सूर्यवंशी यांना येथे कायम ठेवण्यात आले; तर (बदलीचे ठिकाण) एस. आर. जगताप (नांदेड), अशोककुमार भिल्लारे (नगर-संगमनेर), पी. वाय. लाडेकर (जळगाव), सरिता पवार (औरंगाबाद), एम. जे. धोटे (जालना), ए. जी. बिलोलीकर (मुंबई), एन. जी. गिमेकर (नाशिक), एस. एस. गुल्हाने यांची (ठाणे-पालघर) बदली झाली आहे. 

एस. के. एस. रझवी, के. के. जहागीरदार, आर. एन. सरदेसाई, पी. सी. भागुरे, एन. के. ब्रह्मे, ए. के. पाटील, ए. के. शाह, एस. एच. ग्वालानी यांची पुण्यात बदली झाली आहे

संबंधित लेख