DSK ना पहाटे दिल्लीतून पुणे पोलिसांनी उचलले! 

DSK ना पहाटे दिल्लीतून पुणे पोलिसांनी उचलले! 

पुणे: गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रमाणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पत्नीसह पहाटे दिल्लीत अटक करण्यात आली. 230 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

गेले दीड दोन महिने त्यांच्या अटकपुर्व जामिनाचा लपंडाव सुरु होता. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिथे 50 कोटी भरण्याच्या अटीवर अटकपुर्व मंजूर करण्यात आला होता. मात्र ते मुदतीत पैसे भरु न शकल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दाद ठोठावले. तिथे आणखी मुदत मिळाली, तरीही ते उच्च न्यायालयात 50 कोटी भरु शकले नाहीत. कुलकर्णी वेगवेगळी कारणे देत असल्याने त्यांना तीन चार वेळा न्यायालयाने मुदत दिली. एवढे करुनही त्यांनी पैसे न भरल्याने काल उच्च न्यायालयाने त्यांचे संरक्षण काढून घेतले. परिणामी पोलिसांना अटकेचा मार्ग मोकळा झाला. यावेळी न्यायालयाने गुंतवणुकदारांची माफीही मागितली. 

त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने हालचाल करत कुलकर्णी यांना पत्नीसह दिल्लीतून अटक केली. त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com