PUNE dISTRICT GRAMPANCHAYT RESULT | Sarkarnama

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची 115 गावांमध्ये सत्ता; काॅग्रेसकडे २९ तर भाजपकडे फक्त नऊ गावे 

गजेंद्र बढे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे, ता. 17 ः जिल्ह्यातील 222 पैकी 218 ग्रामपंचायतींची निवडणूक सोमवारी झाली. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक 115 ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. कॉंग्रेसने 29 ग्रामपंचायती ताब्यात घेत, दुसरे स्थान पटकावले. शिवसेनेला 14 आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला मात्र अवघ्या 9 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. 

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता काबीज केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींवर अपक्ष व अन्य स्थानिक आघाड्यांनी सत्ता मिळविली आहे. 

येत्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या पुणे जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी हवेली तालुक्‍यातील फुरसुंगी ही ग्रामपंचायत पुणे महापालिकेत गेल्याने, तेथील निवडणूक रद्द करण्यात आली. भोर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍यांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे या तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले नाही. निवडणूक आयोगाला या तीन गावांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. वढाणे (ता. भोर), फलोदे (ता. आंबेगाव) आणि वाणेवाडी (ता. जुन्नर) ही ती तीन गावे आहेत. 

जिल्ह्यात या वेळी पहिल्यांदाच सरपंच थेट जनतेतून निवडण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये सरपंच एका पक्षाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बहुमत मात्र अन्य पक्षांकडे अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे विजयी झालेले गावनिहाय पॅनेल कोणत्या पक्षाचे होते, याच्या आधारे विजयाची आकडेवारी काढण्यात आली आहे. 

निवडणूक जाहीर झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायती अर्ज माघारीच्या दिवशीच बिनविरोध झाल्या होत्या. याशिवाय 31 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे सोमवारी 169 ग्रामपंचायतींसाठीच मतदान झाले. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांपैकी पुरंदरमधील एकाही ग्रामपंचायतीची निवडणूक या वेळी नव्हती. 

तालुकानिहाय पक्षनिहाय ग्रामपंचायती (कंसात एकूण संख्या) 
बारामती (13) : सर्वच्या सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस 
मुळशी (11) : राष्ट्रवादी कॉंग्रेस - 09, शिवसेना - 02 
इंदापूर (26) : राष्ट्रवादी कॉंग्रेस- 13, कॉंग्रेस- 09, अन्य 04 
दौंड (08) : राष्ट्रवादी कॉंग्रेस- 06, रासप- 02 
भोर (54) : राष्ट्रवादी कॉंग्रेस- 27, कॉंग्रेस- 18, संमिश्र- 05, अन्य- 03, निवडणूक झाली नाही- 01 
वेल्हे (28) : राष्ट्रवादी कॉंग्रेस- 10, कॉंग्रेस- 08, भाजप- 02, अन्य- 08 
मावळ (09) : राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप प्रत्येकी- 04, शिवसेना- 01 
जुन्नर (15) : राष्ट्रवादी कॉंग्रेस- 11, शिवसेना- 03, निवडणूक झाली नाही - 01 
आंबेगाव (22) : राष्ट्रवादी कॉंग्रेस - 14, शिवसेना- 06, अन्य- 01, निवडणूक झाली नाही- 01 
शिरूर (04) : राष्ट्रवादी कॉंग्रेस - 03, भाजप- 01 
हवेली (08) : राष्ट्रवादी कॉंग्रेस- 05, भाजप - 02, शिवसेना- 01 
खेड (23) : राष्ट्रवादी कॉंग्रेस - 20, भाजप व शिवसेना प्रत्येकी - 01, अन्य 01 
 
संबंधित लेख