धनगर आरक्षणाबाबत केंद्राकडे शिफारसीसाठी `टीस'च्या अहवालावर अभ्यास सुरू : मुख्यमंत्री
धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी `टीस'ने दिलेल्या अहवालावर अभ्यास सुरू असून, लवकरच केंद्राला शिफारस करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
पुणे : धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी `टीस'ने दिलेल्या अहवालावर अभ्यास सुरू असून, लवकरच केंद्राला शिफारस करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली.
धनगर समाजाच्या आरक्षणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी लागणार आहे. `टीस'ने दिलेल्या अहवालावर अभ्यास सुरू आहे. शिफारस करण्यासाठी काही बाबींची पूर्तता करत आहोत. त्यामध्ये उप समितीने लक्ष घातले आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली जाईल. त्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे.
या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहारी रुपनवर, रामराव वडकुते आदींनी सहभाग घेतला.