pune-deepak-salunkhe-madha | Sarkarnama

माढ्यातून `राष्ट्रवादी'ने मलाच उमेदवारी द्यावी : दीपक साळुंखे

संपत मोरे
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

"मी माढा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, मला लोकांचाही पाठिंबा मिळतोय,दिवसेंदिवस सामान्य लोकही मला येऊन पाठिंबा देत आहेत. माझ्यावर प्रेम करणारी जनता षड्यंत्राला बळी पडणार नाहीत," अशा शब्दांत माजी आमदार दीपक साळुंखे यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार केला.

पुणे : "मी माढा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, मला लोकांचाही पाठिंबा मिळतोय,दिवसेंदिवस सामान्य लोकही मला येऊन पाठिंबा देत आहेत. माझ्यावर प्रेम करणारी जनता षड्यंत्राला बळी पडणार नाहीत," अशा शब्दांत माजी आमदार दीपक साळुंखे यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार केला.

"कसलीही कारस्थाने रचली तरी लोकांचा माझ्यावर विश्वास आहे," असंही ते म्हणाले. 

साळुंखे यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती,त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह माढा मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या ऑडिओबाबत साळुंखे यांनी खुलासाही केला. 

`सरकारनामा'शी बोलताना ते म्हणाले, "माझ्याविरोधात कारस्थान रचलं गेलं.पण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी लोकसभा निवडणूक लढवावी असा माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.मला दिवसेदिवस लोकांचा पाठिंबा मिळतोय.कोणीही कितीही षड्यंत्रे केली तरी लोक जोपर्यँत माझ्यासोबत आहेत आणि मी लोकांसोबत आहे तोपर्यन्त असल्या षड्यंत्रांचा काही उपयोग होणार नाही.

"मी माढा मतदारसंघाचा दौरा करतोय तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मलाच पक्षाने उमेदवारी द्यावी," असं ते म्हणाले.

संबंधित लेख