पुण्यात भाजपाची घाई उघड : नव्या इमारतीची उदघाटनानंतरही कामे सुरूच

पुण्यात भाजपाची घाई उघड : नव्या इमारतीची उदघाटनानंतरही कामे सुरूच

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह सर्व पदाधिकाऱ्यांसाठी नव्या इमारतीमध्ये देखणी दालने उभारण्यात आली खरी मात्र; या दालनांमधून कारभार हाकण्यासाठी त्यांना आणखी दीड महिन्यांनी मुहूर्त सापडणार आहे. इमारतीतील किरकोळ कामे करावयची असल्याची कारणे प्रशासनाने मांडल्याने पदाधिकाऱ्यांना नव्या दालनांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यानिमित्ताने इमारतीच्या उदघाटनाची घाई केल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. 

नव्या इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात इमारतीच्या घुमटातून गळती झाल्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व महापालिका प्रशासनाच्या कारभारावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. या प्रकरणी दोषींवर कारवाईची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी केली होती. मात्र, संबंधित ठेकेदाराला नोटीस तर सोडाच साधी विचारणाही करण्यात आलेली नाही ही बाबदेखील सत्ताधारी भाजपाला अडचणीची ठरत आहे. 


या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात झाले. मात्र, काम पूर्ण नसताना तिचे उदघाटन होत असल्याचा आक्षेप महापालिकेतील विरोधी पक्षांनी घेतला होता. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्त्यारोपही झाले. तरीही, बहुतांशी कामे करण्यात आल्याचा दावा करीत सत्ताधारी भाजपने या इमातीचे उदघाटन केले. त्यानंतर साधारणत: आठवडाभरात या इमारतीतून कामकाज सुरू होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, सर्वच मजल्यांवरील पदाधिकाऱ्यांची दालने, सभागृह आणि छतावरील काही कामे राहिल्याचे महापालिकेच्या भवनरचना विभागाने सांगितले. ती पूर्ण करण्यासाठी सव्वा ते दीड महिन्यांचा अवधी लागेल, असेही सांगण्यात आले. 

भवनरचना विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी लंके म्हणाले, ""इमारतीतील बहुतांशी कामे करण्यात आली आहे. थोडीफार कामे शिल्लक राहिली आहेत. ती पुढील दीड महिन्यात करण्यात येतील. सध्या रोज वेगाने कामे होत आहेत. त्यांचा आढावाही घेण्यात येत आहे. त्यानंतर पदधिकारी-अधिकारी नव्या इमातीतून कामकाज करतील.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com