Pune : Congress party internal elections | Sarkarnama

पुण्यात कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेच्या निवडणुका गुपचूप ? 

मंगेश कोळपकर
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे  :  कॉंग्रेसच्या शहरातील दहा ब्लॉक अध्यक्षांची आणि प्रदेश प्रतिनिधींची निवडणूक येत्या 25 सप्टेंबरपर्यंत घ्यावी, असा आदेश प्रदेश कॉंग्रेसने दिला आहे. मात्र, नऊ दिवसांवर निवडणूका आल्या तरीही या बाबत शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अद्याप माहिती मिळालेली नाही, अशी तक्रार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे शनिवारी शहरातील काही कार्यकर्त्यांनी केली. निवडणूका गुपचूप घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

कॉंग्रसेच्या शहरातील दहा ब्लॉक अध्यक्षांची निवडणूक आणि प्रदेश कॉंग्रेससाठी सहा प्रतिनिधींच्या नियुक्तीची प्रक्रिया 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश प्रदेश कॉंग्रेसने दिला आहे. निवडणुका नऊ दिवसांवर आल्या तरी तळातील कार्यकर्त्यांना या बाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक गुंडाळण्याचा काही जणांचा प्रयत्न दिसतो. 

तसे होऊ नये, यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे शहर पदाधिकाऱ्यांना बंधनकारक करावे, अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्ते संजय बालगुडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. ब्लॉक अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधींमार्फत शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष ठरतात. त्यामुळे पक्ष संघटनेच्या दृष्टिने या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.दरम्यान, या बाबत शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे विचारणा केली असता, निवडणुकांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे. शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विभागनिहाय मेळावे सुरू आहेत. त्यात या बाबतची माहिती दिली जात आहे. निवडणुका या नेहमीच्या पद्धतीने सर्वांना विश्‍वासात घेऊनच होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

' प्रदेश प्रतिनिधी नवे हवेत' 
पक्षसंघटना बळकट करण्यासाठी ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुकीत कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागूल यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे शनिवारी केली. तसेच प्रदेश प्रतिनिधी यंदा तरी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. प्रदेश प्रतिनिधी कार्यकर्ते शहर कॉंग्रेसने गेल्या काही वर्षांत बदलले नाहीत, असाही आरोप त्यांनी निवेदनात केला. 

संबंधित लेख