pune-Chhattisgarh-election-exit-poll | Sarkarnama

छत्तीसगड सर कोण करणार ? एक्‍झिट पोलचा अंदाज काय ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

छत्तीसगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी गड राखेल असा अंदाज "एबीपी माझा'ने दिला आहे. मात्र "आज तक'च्या एक्‍झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्तेत येईल, असे म्हटले आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्‍सच्या अंदाजानुसार भाजपाला 46 तर कॉंग्रेसला 35 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पुणे : छत्तीसगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी गड राखेल असा अंदाज "एबीपी माझा'ने दिला आहे. मात्र "आज तक'च्या एक्‍झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्तेत येईल, असे म्हटले आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्‍सच्या अंदाजानुसार भाजपाला 46 तर कॉंग्रेसला 35 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

90 जागा असलेल्या विधानसभेत भाजपाला 52, कॉंग्रेसला 35 तर इतरांना तीन जागा मिळतील, असे एबीपी माझाच्या एक्‍झिट पोलमध्ये म्हटले आहे. आज तकच्या पोलमध्ये कॉंग्रेस बहुमतात येईल, असे म्हटले आहे. आज तकच्या पोलनुसार कॉंग्रेस 54 जागा जिंकून सत्तेत येईल. भाजपाला केवळ 33 जागावर समाधान मानावे लागेल तर इतरांपा केवळ तीन जागा मिळतील. आज तकच्या पोलनुसार कॉंग्रेस व भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत एक टक्कयाचा फरक असला तरी कॉंग्रेसला अधिक जागा मिळण्याची शक्‍यता आहे.

राज्यात गेल्या 15 वर्षापासून भाजपा सत्तेत आहे. अजित जोगी यांनी कॉंग्रेसबरोबर न जाता सवता सुभा निर्माण केला असला तरी मतांमध्ये फूट पडूनही भाजपाला त्याचा कोणताच फायदा होताना दिसत नसल्याचे या पोलमध्ये स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 15 वर्षांपासून भाजपाची राज्यात सत्ता आहे. सत्ताधाऱ्याविरोधातील रोष मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचा दावा "आज तक'च्या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.  

 
 

संबंधित लेख