Pune BJP tries to take credit of Civil work | Sarkarnama

अजितदादांच्या नावाची कोनशिला काढल्याने वाद

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 जुलै 2017

आज महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या टाकीच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी भूमीपुजन झाल्यानंतर त्या ठिकाणी अजित पवार यांचे नांव असलेली कोनशीला लावण्यात आली होती

राष्ट्रवादी आणि भाजप पदाधिकर्त्यांत शाब्दिक चकमक
वडगाव शेरी (पुणे) : खराडीतील ज्या पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन वर्षभरापुर्वी अजित पवार यांनी केले होते, त्याच पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन आज पुन्हा भाजपने महापौरांच्या हस्ते घडवून आणले. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने या परिसरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले.

आजच्या कार्यक्रमापूर्वी ही कोनशीला काढल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वातावरण तापले. इथल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक होत कार्यक्रमस्थळीच महपौरांना याचा जाब विचारला. त्यावर महापौरांनी हा विषयच माहित नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले व चौकशी करते एवढेच उत्तर दिले.

यावेळी झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन स्थानिक नगरसेवकांना ताब्यात घेतल्यानंतर महापौरांच्या हस्ते भूमिपुजन उरकण्यात आले.

संबंधित लेख